
सॅमसंगने आपली बहुचर्चित गॅलेक्सी एस26 सीरिज लाँच केली आहे. कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे झालेल्या कार्यक्रमात कंपनीने तीन फोन लाँच केले. या सीरिजअंतर्गत सॅमसंग गॅलेक्सी एस26, गॅलेक्सी एस26 प्लस आणि गॅलेक्सी एस26 अल्ट्रा असे तीन फोन लाँच केले आहेत. हे तिन्ही फोन प्री ऑर्डरसाठी उपलब्ध असून या फोनची विक्री 6 मार्चपासून सुरू होणार आहे.
फोनची किंमत किती?
सॅमसंग गॅलेक्सी एस26 च्या 12 जीबी रॅम प्लस 512 जीबी स्टोरेज पह्नची किंमत 87,999 रुपये, गॅलेक्सी एस26 पल्सच्या 12 जीबी प्लस 512 जीबी स्टोरेज पह्नची किंमत 1 लाख 19 हजार 999 रुपये, सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्राच्या 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज पह्नची किंमत 1 लाख 39 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.




























































