…तर सचिनने शतकांचा पाऊस पाडला असता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झाले असून आयसीसीकडून वन डे क्रिकेटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा फायदा फलंदाजांना होत आहे. आयसीसीच्या सध्याच्या नियमांमध्ये सचिन तेंडुलकरने फलंदाजी केली असती तर त्याने अक्षरशः धावांचा आणि शतकांचा पाऊस पाडला असता, असे मत श्रीलंकेचा माजी स्पह्टक सलामीवीर सनथ जयसूर्याने व्यक्त केले.

विराट कोहलीने 50 वे शतक झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रम मोडीत काढला आहे. या ‘विराट’ पराक्रमामुळे कोहलीवर काwतुकांचा वर्षाव होत असताना श्रीलंकेचा माजी स्पह्टक सलामीवीर सनथ जयसूर्या यांनी सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया दिली. गेल्या काही वर्षांमध्ये झटपट क्रिकेटमध्ये अनेक बदल आयसीसीने केले आहेत. हे बदल फलंदाजांच्या पथ्यावर पडत असून त्याचा ते धुवांधार फायदा घेत आहे. सध्याच्या नियमांमध्ये सचिनने फलंदाजी केली असती धावांचा पाऊस पडलाच असता आणि शतकांचाही मोठा विक्रम रचला गेला असता, असेही जयसूर्या म्हणाला.

…तरच रिव्हर्स स्विंगची कला जिवंत राहील – वकार
आयसीसीच्या नव्या नियमानुसार दोन्ही बाजूने नव्या चेंडूचा वापर केला जात आहे. याचा फायदा फलंदाजांना नक्कीच होत आहे. पण 30 षटकांनंतर एक चेंडूचा वापर बंद करावा. जेणेकरून एक चेंडू निदान 35 षटकांपर्यंत खेळवला जाऊ शकतो. गोलंदाजांसाठी रिव्हर्स स्विंग ही महत्त्वाची बाब असल्याने 35 षटकांपर्यंत एक चेंडू खेळवल्यास रिव्हर्स स्विंग ही कला लोप पावणार नाही, असे मत पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस यांनी सोशल मीडियावर व्यक्त करत आयसीसीच्या नव्या नियमावर प्रकाश टाकला आहे.