
प्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे यांची कन्या अभिनेत्री रुमानी खरे हिचा विवाहसोहळा ८ मार्च २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. रुमानीने लोकप्रिय मराठी अभिनेता स्तवन शिंदेसोबत लग्नगाठ बांधली असून, या मराठमोळ्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. संदीप खरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
पुण्यातील अत्यंत पारंपरिक आणि सात्विक वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला. लग्नासाठी रुमानीने खास नऊवारी पैठणी परिधान केली होती, तर स्तवनने पारंपरिक कुर्ता आणि धोतर असा पेहराव केला होता. याआधी डिसेंबर २०२५ मध्ये या जोडीचा साखरपुडा झाला होता. चाहत्यांनी या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रुमानी खरे हिने ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, तर स्तवन शिंदे हा देखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. स्तवनने ‘पावनखिंड’ सारख्या चित्रपटात आणि अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. या विवाह सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. संदीप खरे यांची एकुलती एक कन्या बोहल्यावर चढल्याने खरे कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
View this post on Instagram



























































