सांगली ग्रामीण भागात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

सांगली जिल्ह्यात आज कोरोनाने चौदावा बळी घेतला असतानाच जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात काही गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनत आहेत. शिराळा तालुक्यातील मणदूर, जत तालुक्यातील बिरूळ आणि पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हे नवे हॉटस्पॉट प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे.

सांगली जिल्ह्यात अलिकडच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यातच आज मिरजेतील अमननगर येथील कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता 14 झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्या पाचशेच्या वर गेली आहे. सद्यस्थितीत तीनशेपेक्षा अधिक रुग्णावर मिरजेच्या शासकीय covid-19 रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात शिराळा तालुक्यातील मणदूर, जत तालुक्यातील बिळूर आणि पलूस तालुक्यातील दुधोंडी अलीकडच्या काळात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर हे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या