मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे साखराळे येथे उर्त्स्फूत स्वागत

573

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, बजरंग पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, वाळवा उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार राजेंद्र सबनीस आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन उर्त्स्फूतपणे स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या