… तरीही त्यांनी दारातील ध्वजारोहणाची परंपरा कायम राखली

588

संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण गावात 50 वर्षापूर्वी जेव्हा ग्रामपंचायत, तलाठी कार्यालये आणि शाळा नव्हत्या त्या काळात सरपंच आणि पोलीस पाटलाच्या घरातच चावडी वाचन व्हायचं, शाळा भरायची, गावचा कारभार त्याच घरातून चालत होता. त्याकाळापासून स्वातंत्र्यदिनी त्यांच्या घराजवळच ध्वजारोहण करण्यात येत होते. कालांतराने गावात शाळा,ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालये सुरू झाली. सरपंचपदी असलेल्या मांगले यांच्या घरातून चालणारा गावचा कारभार थांबला तरीही त्यांनी ध्वजारोहणाची परंपरा आजही कायम ठेवली आहे.मांगले कुटुंबात तीन पिढ्या सरपंच पद भूषवित आहेत. या तीनही पिढ्यांनी देशभक्तीची ही परंपरा कायम ठेवत ध्वजारोहण सुरू ठेवले आहे.

पूर्वीच्या काळात तत्कालीन पोलीस पाटील तात्या मांगले आणि सरपंच अण्णा मांगले यांच्या घरातच कासारकोळवण ग्रामपंचायतीचा कारभार चालत होता. त्यांच्याच घरात शाळा भरायची. दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन मांगले कुटुंबीयाच्या दारात ध्वजारोहण करून साजरा केला जात होता.गावात ग्रामपंचायत कार्यालये सुरू होताच त्यांच्या घरातून गावचा चालणारा कारभार थांबला मात्र मांगले कुटूंबाच्या घराबाहेर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजीच्या ध्वजारोहणाची परंपरा सुरू ठेवली आहे.मांगलेच्या दुसऱ्या पिढीतील सुभाष मांगले आणि विश्वास मांगले,तिसऱ्या पिढीतील सचिन मांगले आणि धनंजय मांगले यांनी हि परंपरा कायम ठेवली आहे.आजही त्यांच्या घराच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले

आपली प्रतिक्रिया द्या