मुख्यमंत्र्यांनी तहसीलदारांना खुर्चीत बसवले अन् त्यांच्यासोबत फोटोही काढला!

1227

सरकारी यंत्रणेमध्ये ‘प्रोटोकॉल’चा नको तेवढा बागुलबुवा केला जातो. प्रोटोकॉल पाळतापाळता अनेकदा अधिकारीवर्ग घायकुतीला येतात. मात्र प्रोटोकॉल बाजूला सारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तहसीलदाराचा अनोखा सन्मान नुकताच केला. मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला खुर्चीत बसवले. स्वतः उभे राहिले अन् फोटोही काढू दिला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीने सारेच भारावले असून त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ईश्वरपूर तहसील कार्यालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रकारी उद्घाटन झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मनाचा मोठेपणा सर्वांना दिसला. करिष्ठ आल्यानंतर आपण त्यांना आपली खुर्ची द्यायची, त्यांच्यासमोर काकून उभे राहायचे, त्यांच्या दौऱयाची सगळी सरबराई करायची, निकास, काहन आणि भोजन याची सगळी क्यकस्था करायची याची सकय तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांना झालेली असते. मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्याला खुर्चीत बसायचा मान मिळेल याची कल्पनाही कोणतेच तहसीलदार करू शकणार नाहीत. मात्र ईश्वरपूर येथील तहसीलदार रवींद्र सबनीस यांना खुर्चीत बसवून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढला. ‘तळागाळात काम करणाऱया अधिकाऱ्याला प्रोटोकॉल बाजूला ठेवून असा सन्मान दिल्याचा प्रकार फार दुर्मिळ आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना सलाम करतो’ अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर आम्ही मान्यवरांसोबत दालनाकडे गेलो. वाटेतच मुख्यमंत्री म्हणाले, तुम्हालाच खुर्चीत बसवतो. मी विनम्रपणे पुन्हा नकार दिला. खुर्चीजवळ गेल्यानंतरही मी नकार देत होतो. कारण ते राजशिष्टाचारामध्ये बसत नव्हते. आपण उद्घाटक आहात. त्यामुळे तुम्ही खुर्चीत बसलात तर तो आमचा बहुमान असेल अशी मी त्यांना विनंती केली. मग मुख्यमंत्री स्वत: खुर्चीत बसले, त्यानंतर पुन्हा मला खुर्चीत बसायला त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, शंभूराज देसाई आणि विश्वजीत कदम असे सहा मंत्री होते. आमचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरीसुद्धा होते. त्यामुळे माझी पंचाईत झाली, पण मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे मी खुर्चीत बसलो. माझ्यासाठी हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. मला तुमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. – रवींद्र सबनीस (तहसीलदार, ईश्वरपूर सांगली)

आपली प्रतिक्रिया द्या