सांगलीतील कोरोनाचे दहा रुग्ण कोरोनामुक्त

557

सांगली जिल्ह्यातील एकूण 25 कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित बाराजणांची स्वॅब टेस्टचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे उद्या रात्रीपर्यंत दुसरा रिपोर्ट येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली. त्यामुळे सांगली जिल्हा सध्या कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे असेच म्हणावे लागेल.

सांगली जिल्ह्यातील चार जणांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली हे चारही जण सौदी अरेबियाला जाऊन आले होते या चार जणा मुळे त्यांच्याच कुटुंबातील इतर 21 जणांना कोरोनाची लागण झाली या 25 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यापैकी पहिल्या चार जणांचे तीन दिवसांपूर्वी दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले होते, आणि त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यानंतर काल तीन जणांचे आणि आज तीन जणांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. त्यामुळे एकूण दहा जण आज अखेर कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत आशादायक मानली जात आहे.

उर्वरित 12 जणांचचा स्वॅब टेस्टचा पहिला अहवाल (रिपोर्ट) निगेटिव्ह आला आहे, उद्या उद्या रात्री पर्यंत त्यांचा दुसरा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सांगली जिल्हा सध्या कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे असेच म्हणावे लागेल. या एकाच कुटुंबातील सदस्या शिवाय बाहेरच्या एकालाही कोरोना ची लागण झालेली नाही, जिल्ह्यात आता 723 जण होम क्वॉरंटाईन मध्ये आहेत तर 79 लोक आयशोलेशन वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली आहेत.

संपूर्ण जिल्ह्यावर अत्यंत कडक वॉच या पुढच्या काळात ही आमचा असणार आहे बाहेरील जिल्ह्यातून कोण नवीन माणूस आल्यास त्याची तातडीने चौकशी आणि तपासणी करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत असेही जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या