संगमेश्वर- येडगेवाडीला बसतायत पाणी टंचाईच्या झळा; पाणी पातळी खालावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना मुंबई आणि पुण्यातील चाकरमान्यांनी आपल्या गावचा रस्ता धरत गावात येण्याला पसंती दिली आहे चाकरमान्यांच्या गावाला येण्याने गावाच्या लोकसंख्येत भर पडल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. येडगेवाडी ही नियमीतपणे टंचाई मधील वाडी आहे दरवर्षी येडगेवाडीत पीण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते, मात्र यावेळी कोरोनामुळे चाकरमान्यांचा अधिकचा भरणा झाल्यामुळे पाणी टंचाईत वाढ झाली आहे.

येडगेवाडीत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक उद्भव विहीरी आहेत. मात्र या विहींमध्ये पाणीसाठा मुबलक नसल्याने टंचाई निर्माण झाली आहे. त्यात आता पावणे तीनशे चाकरमान्यांची भर पडली आहे. तर स्थानिकांची लोकसंख्या लक्षात घेता येडगेवाडीत असणाऱ्या विहीरींवर ताण आला आहे. दरवर्षी येडगेवाडीत पाण्याचा टँकर सुरू करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे लवकर टँकर सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येडगेवाडी टंचाई कृती आराखड्यात असून मागणीनुसार टँकर सुरु व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे.