बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर सर्व चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून रांगडा गडी संग्राम चौगुलेने घरात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेतली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात यंदा पहिल्या दिवसापासून दोन गट पडले आहेत. अशातच नव्याने घरात दाखल झालेला संग्राम संग्राम कोणत्या टीमची साथ घेऊन पुढचा प्रवास करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.