
दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजारो लोक सामील झाले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आता या भागात कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महानगरपालिकेकडून सॅनिटाझेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचार्यांनी निजामुद्दीन भागात डिसइंफेक्टेंटची फवारणी केली.
शुक्रवार सकाळपासून निजामुद्दीन भागात साफ सफाई आणि सॅनिटायझेशनचे काम सुरू करण्यात आले. 30 तारखेपासून या भागात स्वच्छतेचे काम सुरू आहे अशी माहिती अधिकार्यांनी दिली. मरजकमध्येही सॅनिटायझेशनचे काम करण्यात आले तसेच्च मरकज शेजारी असलेल्या एका मशिदीतही सॅनिटायझेशनचे काम करण्यात आले.
दिल्ली: दिल्ली नगर निगम ने निज़ामुद्दीन और उसके आसपास के इलाकों के सेनिटाइजेशन का काम शुरू किया।ओमप्रकाश पांचाल,MCD वार्ड इंचार्ज,दरियागंज ने बताया: हम 30 तारीख़ से यहां आ रहे हैं,हमने मरकज़ को सेनिटाइज किया है।मरकज़ के साथ में एक मरकज़ मस्जिद है हमने आज उसको भी सेनिटाइज किया। pic.twitter.com/GqmQ8sh4Hj
— ANI_HindiNews (@AHindinews) April 3, 2020
मार्च महिन्यात मरकजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमासाठी देश विदेशातील दोन हजारहून अधिक लोक जमले होते. जमलेल्या लोकांमध्ये अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर अनेक रुग्णांना दिल्लीच्या इस्पितळाअत दाखल करण्यात आले होते. मरकजमध्ये सामील झालेले अनेक लोक देशाच्या अनेक राज्यात गेले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. जे जे लोक मरकजमध्ये सामील झाले होते त्यांचा तपास पोलीस सुरू करत आहेत.



























































