
दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे तूर्त काही दिवस विश्रांती घेण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाही संजय राऊत यांनी आपला लढवय्या बाणा कायम ठेवला आहे. आजारपणातही लेखणी सुरूच असल्याचे त्यांनी पोस्ट शेअर करत दर्शवले आहे. हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता! अशी पोस्ट राऊत यांनी केली. त्यांच्या या पोस्टखाली नेटकऱ्यांनी लवकर बरे व्हा अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हात लिहिता राहिला पाहिजे
कसेल त्याची जमीन
लिहील त्याचे वृत्तपत्र
हा आमच्या पिढीचा मंत्र होता! pic.twitter.com/AowQ9MhfLN— Sanjay Raut (@rautsanjay61) November 6, 2025




























































