… आता मिंधे गटाला बेईमानीचा खंजीर काय असतो ते भाजपकडून कळेल, संजय राऊत यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीत भाजपने फोडोफोडीचे राजकारण करत शिंदे गटाला जोरदार धक्का दिला. भाजपकडे केवळ 27 सदस्य असतानाही भाजपने मित्र पक्षाचेच सदस्य फोडून बहुमताचा आकडा गाठला. भाजपच्या या ऑपरेशन लोटसनंतर मिंधे गटाचे शंबूराज देसाई भडकले व त्यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर जोरदार निशाणा साधला.

”टीव्हीवर एक हास्यजत्रा नावाचा कार्यक्रम असतो त्याचे निर्माते व लेखकांनी साताऱ्यातील या एपिसोडवर हास्यजत्रेतील स्किट करायला हरकत नाही. जे लोकशाहीचा गळा घोटला वगैरे म्हणतायत त्यांनी लोकशाहीच्या छाताडावर पाय ठेवून एक सरकार स्थापन केलं. ते असं म्हणतात की जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर पक्षांतर कायद्याअंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे. जेव्हा आम्ही तुमच्यावर कारवाई करायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही का उसळून आलात? आता मिंधे गटाला बेईमानीचा खंजीर काय असतो ते भाजपकडूनच कळेल”, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.