सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मालवणातील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आज कोसळला. अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला आहे. त्यावरून सध्या शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून राज्यभरात मिंधे सरकारचा तीव्र निषेध होत आहे.
हे चित्र मराठी मनाला विचलीत करणारे आहे. श्रेयघेण्याची घाई.निवडणुकांचेराजकारण.आणि राष्ट्रीयकामात खाऊबाजीयामुळेच हे घडले. गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात हीशिवरायानीच झिडकारले.
सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राजीनामाद्या! pic.twitter.com/sLMOhDo6BW— Sanjay Raut (@rautsanjay61) August 26, 2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील यावर संताप व्यक्त करत मिंधे सरकारला फटकारले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.
”हे चित्र मराठी मनाला विचलीत करणारे आहे. श्रेय घेण्याची घाई. निवडणुकांचे राजकारण आणि राष्ट्रीय कामात खाऊबाजी यामुळेच हे घडले. गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात हे शिवरायांनीच झिडकारले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राजीनामा द्यावा’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.