भोंदूबाबाच्या स्थानावर फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी काही विधी झाल्यानंतर या धाडी सुरू झाल्या – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील अनेक मंत्री हे भोंदू बाबांच्या सल्ल्याने राज्याचा कारभार करतायत. देवेंद्र फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी या भोंदूबाबाच्या स्थानावर काही विधी झाल्या त्यानंतरच या धाडी सुरू झाल्या, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

”महाराष्ट्रातील अनेक मंत्री हे भोंदू बाबांच्या सल्ल्याने कारभार करतायत. अंधश्रद्धेचा वापर करून आपला विभाग चालवतायत. काल नाशिकच्या एका बाबाला अटक झाली. ते महाशय गेले काही काळ आपल्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांना सल्ले देत होते. मंत्रालयातल्या बदल्यांमध्ये त्यांचा हात होता. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याच्या अनेक महत्त्वाच्या बदल्या व इतर कामांत हे बाबा स्वत: लक्ष घालत होते व ते काम करण्यास केसरकरांना भाग पाडत होते. ट्रायडेंट हॉटेलला बसून त्यांच्या भक्तांकडून कामं करून घेत होते. शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचे. अशा पद्धतीने राज्याच्या मंत्रीमडळात मंत्री जर काम करत असतील आणि त्याला जर कुणी हिंदुत्व मानत असेल आणि त्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांची शिवसेना फोडली असेल तर त्यांना आमचा साष्टांग नमस्कार आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, विखे पाटील हे सगळे बाडगे आहेत, काल आले आहेत हिंदुत्वाच्या नावावर. विखे पाटील केसरकर कधी झाले हिंदुत्ववादी? बाबा, महाराज, अंधश्रद्धा, रेडे बळी हे यांचं हिंदुत्व आहे आणि त्यासाठी यांनी आमचा पक्ष फोडला. अशा ढोंगी हिंदुत्वाचा उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार केला नाही म्हणून त्यांनी शिवसेना सोडली. आणि त्यांचं हिंदुत्व काय ते आपण पाहिलं. असे 9 मंत्री आहेत. रुपाली चाकणकर हे हिमनगावरचं एक टोक आहे. नऊ मंत्री आहेत जे महत्त्वाचे पोर्टफोलिओ सांभाळतायत. हा बाबा जरी गेला असला तरी अजून बाबा आहेत. त्यांचा प्रभाव मंत्रीमंडळावर आहेत. देवेंद्र फडणवीस आधुनिक विचारसरणीचे विज्ञानवादी मुख्यमंत्री आहेत. वीर सावरकरांना हे मानतात. आम्ही वीर सावरकरांचे विचार सोडले अशी आमच्यावर टीका करतात. पण वीर सावकरांना अशी भोंदूगिरी, लफंगेगिरी मान्य नव्हती. अशा भोंदूबाबांच्या मंत्र्यांना फडणवीसांनी बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. या भोंदूबाबाने या मंत्र्याच्या माध्यमातून काय काय कामं केली, काय काय उद्योग केले ते शोधून काढावे. भोंदूबाबांचे जे स्थान आहे तिथे फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी काही विधी झाले ते उघड झाल्यानंतर या धाडी वगैरे सुरू झाल्या आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

”शिवसेना पक्ष संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे, असे बळी देणे; अघोरी विधी करणे हे आमचे हिंदुत्व नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवण्यासाठी विधी झालेही असतील, तसे प्रकार घडलेले अशी माहिती ही आमच्याकडे होती. पण आम्ही हे सर्व मानत नाही. सगळ्यात मोठा विधी होता तो गद्दारीचा… गद्दारी ही रक्तातून यावी लागते”, असे संजय राऊत म्हणाले.

”दीपक केसरकर यांचा राजीनामा एकनाथ शिंदे यांनी घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील तर त्यांनी ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ अशा कृत्यांमध्ये संबंधित असलेल्या मंत्र्यांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका घेतली पाहिजे. हे राज्य मुख्यमंत्री चालवणार की भोंदूबाबा चालवणार हे देखील स्पष्ट झाले पाहिजे”, असेही ते म्हणाले. या भोंदूबाबासोबत सरकार म्हणून काही पूजा करण्यात आल्याच्या दाव्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”सरकार म्हणून पूजा फक्त पांडुरंगाची होते एकादशीला. अशा प्रकारच्या पूजा जर सरकार म्हणून होतील तर महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही. जेव्हा सरकार म्हणून मुख्यमंत्री अशा प्रकारच्या पूजेला जातात तेव्हा त्या भोंदूबााबांना प्रतिष्ठा मिळते. अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या पाटावर बसणं हे संविधानाची शपथ घेतलेल्य़ा व्यक्तीचं काम नाही. हे हिंदुत्व नाही. विधी पूजा म्हणून ज्या प्रकारचे किळसवाणे प्रकार समोर आले आहे. हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. म्हणूनच आमचा पक्ष फोडण्यात आला”, असे ते म्हणाले.

”प्रशासनातले, राजकारणातले, सत्ताधारी पक्षातले जे लोकं खुर्चीवर बसले आहेत त्यांच्याकडे अशा भोंदूगिरींना जागा नसली पाहिजे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात भोंदूबाबांचं पिक जे आलं आहे त्याला ढोंगी हिंदुत्व जबाबदार आहे. गैर मार्गाने मिळवलेला पैसा आणि त्याला हवं असलेलं संरक्षण जबाबदार आहे. हे राजकीय भोंदूगिरीचं प्रकरण थांबवायचं असेल तर त्या भोंदूबाबाच्या चरणाशी कोण कोण जात होतं ते समोर यायला हवं. ती नावं पोलीय आयुक्तांकडे आहे. नाशिक पोलीस आयुक्त यावर उत्तम तपास करतायतय. मुख्यमंत्र्यांनी यावर एसआयटी स्थापन केली. सगळी नावं समोर आली पाहिजे. दीपक केसरकरांसारखी लोकं अजुनही त्यांचं समर्थन करणार असतील तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातून हकालपट्टी करायला पाहिजे. तुम्ही स्वत:ही प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. तुम्ही यातला एक बळी घेतला. पण यातले मोठे मासे आहेत त्यांचं काय? काळ सोकावतोय, असेही ते म्हणाले.