शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संजय सावंत आणि अशोक धात्रक यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
आदित्य शिरोडकर ठाण्याचे तर विजय परब रावेरचे संपर्कप्रमुख
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आदित्य शिरोडकर यांची ठाणे संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहर, कोपरी, पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा असे आदित्य शिरोडकर यांचे संपर्क क्षेत्र असेल. तर रावेरचे संपर्कप्रमुख म्हणून विजय परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.