बोले तो… मुन्नाभाई आणि सर्किट पुन्हा एकत्र झळकणार

1369

बॉलीवूडमधील सर्वांत धमाकेदार जोडी संजय दत्त आणि अर्शद वारसी आपल्याला पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्ना भाई एम्. बी. बी. एस्’ (2003) ह्या चित्रपटातील सर्किट आणि मुन्नाची जोडी फार प्रसिद्ध झाली होती. इतकेच नाहीतर त्यानंतर आलेल्या (2006) ‘लगे रहो मुन्ना भाई’च्या सिक्वलनंतर ही हिट जोडी पुन्हा कधी एकत्र दिसेल हा प्रश्न त्यांचा चाहत्यांना पडला होता. अशा चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे लवकरच ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. मात्र यावेळी ते ‘मुन्ना भाई…’च्या सिक्वलसाठी एकत्र येत नसून एका नवीन चित्रपटात झळकणार आहेत.

अर्शद ह्याने त्याचा आगामी चित्रपट ‘पागलपंती’ च्या प्रमोशनवेळी सांगितले की, ‘संजू आणि मी पुढीलवर्षी येणाऱ्या चित्रपटात एकत्र काम करणार आहोत. साजिद-फरहाद दिग्दर्शित हा चित्रपट असून, ह्या चित्रपटाचे कथानक अफलातून असणार आहे, असा दावाही त्याने केला. हा चित्रपट पुढील वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी आम्ही ‘बुडापेस्ट’ ला जाणार आहोत.

या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगताना असे अर्शद असे म्हणाला की, आमच्या पुढच्या चित्रपटात संजू एका अंध डॉनची भूमिका साकारत आहे आणि मी त्याचे डोळे असून त्याला सहाय्य करणार आहे. विशेष म्हणजे कोणालाही त्याच्या अंधपणाबद्दल काहीच माहीत नसून मी देखील त्याबाबत कोणाला सांगणार नाही. मी संपूर्ण सिनेमात त्याला प्रत्यक्ष दिग्दर्शित करणार असून ही कथा अत्यंत मजेशीर असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या