छायाचित्रकार संजीव साळवी यांचे कोरोनामुळे निधन

1226

रत्नागिरीतील छायाचित्रकार आणि हरहुन्नरी कलाकार संजीव साळवी यांचे आज कोरोना आजाराने निधन झाले़. दोन आठवड्यापुर्वी संजीव साळवी यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता़. त्यांच्यावर जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते़.

काही दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती सुधारली होती़. मात्र काल रात्रीपासून त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले़. संजीव साळवी यांनी छायाचित्र आणि मॉडेलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते़. अलिकडे ते गोव्यामध्ये कार्यरत होते़. त्याचबरोबर अभिनेता, मिमिक्री आणि निवेदक म्हणून त्यांची ओळख होती़.

आपली प्रतिक्रिया द्या