‘संजू’ने तोडला ‘बाहुबली’चा रेकॉर्ड

18

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनप्रवासावर आधारित असलेल्या ‘संजू’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने १२० कोटींची शानदार कमाई करत आपला पैसा वसूल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे रविवारी ४६.७१ कोटींची कमाई करत संजूने बाहुबली २चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘बाहुबली २’ने रविवारी ४६.५० कोटींची कमाई केली आहे. विधू विनोद चोप्रा निर्मित आणि राजू हिरानी दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. रणबीरसह परेश रावल, दिया मिर्झा, सोनम कपूर, अनुष्का, मनीषा कोईराला यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाला प्रेक्षकांची गर्दी होतेय. शुक्रवारी या सिनेमाने ३४.७५ कोटींची तर शनिवारी ३८.६० कोटींची कमाई केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या