नावामुळे अमेरिकेच्या एअरपोर्टवर होते सारा अली खानची चौकशी

1061

अभिनेत्री सारा अली खान हिला अमेरिकेत जाताना अनेकदा तिच्या नावामुळे तिला अमेरिकेच्या एअरपोर्टवर चौकशीला सामोरे जावे लागते. सारा तिच्यासोबत होणाऱ्या या चौकशीला वैतागली असून तिने हा किस्सा एका कार्यक्रमात सर्वांसोबत शेअर केला आहे. साराच्या अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसावर तिचे आडनाव सुलतान आहे तर टुरिस्ट व्हिसावर तिचे नाव सारा अली खान आहे. या नावाच्या गोंधळामुळे तिची चौकशी होत असते. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.

नावाव्यतिरिक्त साराच्या चौकशीचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे तिचे कमी झालेले वजन. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी साराचे वजन हे तब्बल 96 किलो होते. पदार्पणापूर्वी तिने तिचे तब्बल 45 किलो वजन कमी केल्याचे बोलले जाते. सुरुवातीला अगदी बबली दिसणारी सारा वजन कमी केल्यानंतर अगदी ग्लॅमरस दिसू लागली आहे. तिच्यातील हा बदल पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले. मात्र या बदलाचा तिला बऱ्याचदा मनस्तापही सहन करावा लागतो.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, साराचा पासपोर्ट व व्हिसावर तिचा जुना फोटो आहे. आता सारा ही बारिक झाल्यामुळे थोडी वेगळी दिसते. त्यामुळे अमेरिका एअरपोर्टवरील अधिकारी कायम तिची चौकशी करतात. चौकशी नंतर तिला सोडण्यातही येते मात्र सारा आता या सततच्या चौकशीला वैतागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या