Photo – ‘वोग’ फोटोशूटमधील सारा तेंडुलकरचा एलिगंट आणि क्लासिक लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना अनेक अपडेट देत असते. सारा तेंडुलकर हिचे सध्याचे हे खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत असून, तिच्या या एलिगंट लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

साराने ‘वोग इंडिया’साठी हे फोटोशूट केले असून, यात तिने ‘आयव्हरी-व्हाइट’ रंगाचा ‘स्ट्रॅपलेस’ गाउन घातला आहे. या गाऊनवर खालील भागात आणि कंबरेवर सुंदर एम्ब्रॉयडरी तसेच 3D फ्लोरल डिझाइन आणि सूक्ष्म मण्यांचे काम केलेले दिसते.

या लूकसाठी तिने केस मोकळे सोडलेले असून केसांवर हेअरपीस जोडला आहे.

या लूकसाठी तिने केस मोकळे सोडलेले असून पाठीवर सुंदर लांब वेणी किंवा हेअरपीस जोडला आहे. या हेअरपीसवर पानांच्या आणि वेलींच्या डिझाइनची एक आकर्षक ऑफ-व्हाइट नेट किंवा व्हील घातलेली आहे, ज्यामुळे तिला एक रॉयल आणि व्हिंटेज लुक मिळतो.

अतिशय नॅचरल आणि मिनिमल मेकअप केला आहे. हलका गुलाबी ब्लश, सॉफ्ट न्युड-पिंक लिपस्टिक आणि डोळ्यांचा हलका आयशॅडो तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवतो.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यंची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.