सरोज खान यांच्या बायोपिकमध्ये माधुरीला बघायला आवडेल, मुलगी सुकैनाने व्यक्त केली इच्छा

618

सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची अखेरची इच्छा होती की त्यांच्या आयुष्याकर आधारित बायोपिक प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक असलेल्या रेमो डिसूझाने कराका. मात्र अद्याप यासंदर्भात रेमोशी काही बोलणं झालं नसल्याचे सरोज खान यांनी मुलगी सुकैना हिने सांगितले आहे.

एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सुकैना म्हणाली, बायोपिकमध्ये अम्मीचे पूर्ण जीवन दाखवण्यात येईल. तिने एक महिला असूनही पुरुषांचा दबदबा असलेल्या क्षेत्रात आपले नाव कोरले. वयाच्या तिसऱया कवर्षी अम्मीने बालकलाकार म्हणून काम केले तर वयाच्या 14व्या वर्षी ती नृत्यांगना बनली. तिच्या जीवनातील संघर्ष सिनेमात दाखवण्यात येतील.

सरोज खान यांच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीला बघायला आवडेल, असं विचारल्यावर सुकैनाने माधुरी दीक्षितचे नाव घेतले. मात्र माधुरीशी याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तिने सांगितले. अम्मी म्हणायची सिनेमा काढायला अजून खूप वेळ आहे. कुणाला वाटलं नव्हतं असं काही होईल, असं सुकैना म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या