बाभळदरा येथे माजी सरपंचांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

24

सामना प्रतिनिधी। लातूर

अहमदपूर तालूक्यातील मौजे बाभळदरा येथील माजी सरपंच शिवाजी विठ्ठल मोरे यांना अज्ञातांनी भररस्त्यात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोरे मोटारसायकलवरुन जात असताना काही जणांनी रस्त्यात तार आडवी बांधून त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्या अंगावर डिझेल आणि विषारी औषध टाकून त्यांना पेटवून दिले. पण मोरे यांनी तिथून पळ काढला व बाजूच्या शेतात धाव घेतली. यामुळे त्यांचे प्राण वाचले. पण या घटनेत त्यांची मोटारसायकल जळून खाक झाली आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

गुरुवारी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास मोरे मोटारसायकलवरुन बाभळदरा येथील शेतात निघाले होते. हडोळती ते बाभळदरा या रस्त्यावर येताच त्यांना रस्त्यावर आडवी तार बांधल्याचे दिसले. यामुळे त्यांनी मोटारसायकल थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मोटारसायकल वरुन उतरताना ते पडले. त्याचवेळी झाडांच्या मागे दबा धरुन बसलेल्या तिघाजणांनी त्यांच्या दिशेने डिझेल व एक विषारी ओषध फेकले. पण मोरे यांनी हेल्मेट घातल्याने त्यांचा चेहरा वाचला. त्यानंतर मोरे यांनी तिथून पळ काढला आणि बाजूच्या शेतात धाव घेतली. मोरे हातातून निसटल्याचे बघून हल्लेखोरांनी त्यांची

summeary…sarpanch try to burn alive in latur

आपली प्रतिक्रिया द्या