चायना ओपन बॅडमिंटन – सात्त्विकसाईराज-चिराग जोडीने जिवंत ठेवले आव्हान

437

हिंदुस्थानचे स्टार बॅडमिंटनपटू सलामीच्या फेरीतच गारद झालेले असताना हिंदुस्थानच्या सात्त्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानी तिरंगा डौलाने फडकावत ठेवला आहे. सात्त्विकसाईराज-चिराग यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जून हुई और लियू यू चेन या जोडीला 21-19, 21-15 असे सहज पराभूत करीत उपांत्य फेरीत धडक मारली. सुमारे 43 मिनिटांतच हिंदुस्थानी जोडीने चिनी जोडीचा फडशा पाडला.

याआधी उपउपांत्यपूर्व लढतीत हिंदुस्थानच्या या स्टार जोडीने जपानच्या हीरोयूकी इंडु और यूता वतानाबे या जोडीचा कडवा प्रतिकार 66 मिनिटांत 21-18, 21-13, 21-11 असा संपुष्टात आणला होता. चिनी जोडीवर सात्त्विकसाईराज -चिराग जोडीने आतापर्यंत दोनदा मात केली आहे, तर एकदा त्यांना पराभूत व्हावे लागले आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱयांतच साई प्रणीत, पारुपल्ली कश्यप, सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या हिंदुस्थानच्या स्टार बॅडमिंटनपटूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सात्त्विकसाईराज-चिराग जोडीच्या यशाला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या