सासवडमध्ये जुगार क्लबवर छापा, 30 जण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासवड येथील दिवे घाट माथा परिसरातील हॉटेल विक्टोरिया इन इव्हिनिंग येथे चालत असलेल्या जुगार क्लबवर स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाने काल छापा टाकला. त्यामध्ये 33 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आले असून 30 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी ही कारवाई केली.

सासवड येथील हॉटेल विक्टोरिया इन इव्हिनिंग मध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सासवड पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये छापा टाकून मालकासह एकूण 30 जणांना ताब्यात घेतले. त्याशिवाय 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पांडुरंग काळुराम हरगुडे वय 37 अशोक मारूती आबेकर वय 40 देवीदास दशरथ आबेकर वय 42 अनिल प्रकाश काळे वय 38 सतिश किसण काळे वय 33 संदेश राजेंद्र कुलकर्णी निरोंता नरजीनारी अशोक भाउ वाघमारे वय 47 निलेश दामोदर चौधरी वय 33 अमोल विश्वनाथ पासले वय 32 राहुल श्रीपती शिंदे वय 31cसंतोष चंदु परदेशी वय 47 भावेश बच्चुभाई चौव्हाण वय 51 दादासो तायप्पा महानवर वय 40 नागनाथ वेताळ वाघमारे बालाजी श्रीपती देवकाते वय 44 श्रीनिवास हनुमंता जन्नु वय 52 किशोर मधुकर अवचट वय 56 निखील निलेश मोरे वय 24 वैभव सुर्यकांत परब वय 29 कुबेर श्रीप्रताप सिंग वय 23 शार्दुल नरसिंह जोशी वय 23 मनसुख लाखाभाई परमार वय 56 किशन राम राठोड वय 35 दिपक कनैयालाल शहा वय 56 प्रविण दत्तात्रय बो-हाडे वय 31 उबिनो सत्यन हजारे वय 25 विशाल गणेश जाधव वय 30 प्रदिप पंढरीनाथ गवळी वय 30 अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कामरिगी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी सासवड अण्णासाहेब जाधव , पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक फौजदार जितेंद्र शेवाळे, सुनील ढगारे, विश्वास खरात, राजेंद्र मिरगे ईश्वर जाधव, विशाल भोरडे , किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत, मोसिन शेख, अरुण पवार, राजेश पोळ, भरत आरडे, अजित माने, ज्योतिबा भोसले, महेश उगले, राहुल कोल्हे, प्रकाश यादव यांच्या पथकाने केली.