कृष्णा कारखान्यात ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ, ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेची येणेबाकी शून्य

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या गळीत हंगामावर कोरोना विषाणू या आपत्तींचे संकट असताना सर्व ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी पार पाडू शकलो. या कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवसायांना अडचणी आल्या आहेत. कोरोनामुळे कारखान्यापुढेही अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु तोडणी वाहतूकदार यांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी पार पडला आहे. गेल्या पाच वर्षात ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेची येणेबाकी शून्य रूपये आहे. कृष्णा कारखान्याने साखर कारखानदारी समोर घालून दिलेला एक आदर्श असल्याचे मत संचालक धोंडीराम जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 2021-22 या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ धोंडीराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक दिलीप पाटील, ब्रिजराज मोहिते, सुजित मोरे, पांडूरंग होनमाने, गिरीष पाटील, प्रमोद पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील उपस्थित होते. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. पांडुरंग होनमाने यांनी आभार मानले. मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, केनयार्ड सुपरव्हायझर विजय मोहिते, लेबर अ‍ॅन्ड वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील ,वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल निकम उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या