
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एमआयडीसीमध्ये प्रिमियम चिक फूड कंपनीमध्ये पोत्याची थप्पी पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला तीन दिवस झाले तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला नाही. याउलट हे प्रकरण पोलीस व कंपनी प्रशासनाने दडपले आहे, असा आरोप कामगाराच्या कुटुंबीयांनी केला आहे. या कामगारांची माथाडी गोदामामध्ये नोंद नसल्याने हा अपघात की हत्या याचा तपास करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.


























































