कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर कमी झाला असून, धरणात 86.4 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 81 टक्के भरले असून, धरणात सध्या 26 हजार 638 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, कोयना धरणाच्या दरवाजातून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून, पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत कोयना परिसरात 53 मि.मी., नवजा 94 मि.मी., महाबळेश्वर 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण सातारा जिह्यात पावसाची संततधार सुरू होती. कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.