माध्यमिक शिक्षक क शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न शालेय शिक्षण किभागाकडे प्रलंबित आहेत. या प्रश्नांबाबत अनेकदा निवेदने दिली, प्रत्यक्ष भेटून चर्चाही केली. मात्र, सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षण क्षेत्रातील 28 संघटनांनी मंगळवारी (दि. 6) एकदिवसीय संप पुकारला आहे.
यादिकशी शाळा, कॉलेज बंद ठेवून सर्व संघटनांच्या सातारा जिल्हा शैक्षणिक व्सासपीठामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष अॅड. वसंतराक फाळके, कार्याध्यक्ष सचिन नलवडे, सचिन भरत जगताप यांनी दिली.
शालेय शिक्षण किभागाकडे शासनस्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित असून, शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक आमदार यांनी अनेक वेळा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. या प्रश्नांबाबत अनेकदा विधान परिषद सभागृहात चर्चा झाली. मात्र, धोरणात्मक प्रश्नांवर अद्यापि निर्णय झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक क उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने संस्थाचालक संघटना, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ, शिक्षकेतर संघटना, ग्रंथपाल संघटना, विविध शिक्षक संघटना अशा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील 28 संघटनांनी एकत्र येत मंगळकारी (दि. 6) राज्यभर संप पुकारला आहे.
सातारा जिल्ह्यात सर्व संघटनांच्या सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठामार्फत मंगळवारी राजवाडा, राजपथ, पोकईनाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना देण्यात आले आहे.