‘साथ सोबत’ करणारी प्रेमकथा

काही मोजके चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवतात. याच वाटेवरील ‘साथ सोबत’ हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले.

आयुष्याच्या संध्याकाळी ‘साथ सोबत’ करणाऱ्या सवंगडय़ांची कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट जगण्याची एक नवी दृष्टी प्रदान करणारा आहे. यात एक प्रेमकथाही आहे आणि एक सशक्त संदेशही आहे. राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, संग्राम समेळ, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. मृणाल कुलकर्णी ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून पदार्पण करीत आहे. ‘साथ सोबत’ चे लेखन- दिग्दर्शन रमेश मोरे यांचे असून मारू एन्टरप्रायझेसची निर्मिती आहे.