शनिवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरीत दुचाकी बंदी जाहीर

1244

रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात शनिवारी रात्री बारा वाजल्यापासून दुचाकी बंदी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी ही दुचाकी बंदी करण्यात आली असून हेल्पिंग हॅंडस् आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने रत्नागिरीत घरपोच किरणा आणि औषधे देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.दुचाकी बंदतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य कारण असल्यास पास दिले जात आहेत. त्या पाससाठी गर्दी होऊ नये याकरीता एक वेबसाईट पोलीस खात्याने सुरू केली आहे. covid19.mhpolice.in या वेबसाईटवर संबधित व्यक्तींनी नोंद करावी. गरज लागली तरच पोलीस त्यांना बोलावतील असे डॉ.मुंढे यांनी सांगितले.

13 कैद्यांना सोडणार
तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने कैद्यांना सोडण्यात येणार आहे.रत्नागिरीतील विशेष कारागृहातून 13 कैद्यांना सोडण्यात येणार आहे.

सहकार्य करू इच्छिणाऱ्या रत्नागिरी शहरातील एनजीओना आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना चहा, नाष्टा व जेवण देऊ इच्छिणाऱ्या व इतर प्रकारे मदत करु इच्छिणाऱ्या संस्था व व व्यक्तींकडून आम्हाला संपर्क साधला जात आहे. पण अनेक जणांना अशी परवानगी दिल्यास संचारबंदीचा उद्देश सफल होणार नाही. सद्यस्थितीत पोलीस दलाकडून कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना चहा, नाश्ता व जेवण पुरविले जात आहे.

ज्या एनजीओ व नागरिकांना पोलीस दलास आणि प्रशासनास मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी आपली नावे व संपर्क क्रमांक [email protected] किंवा मोबाईल नंबर 8788342496 (phone /Whats app) यावर कृपया कळवावीत. पोलिसांबरोबरच नागरिकांनाही घरपोच जीवनावश्यक वस्तू, औषधे इत्यादी देणे आवश्यक असल्यामुळे आपण कशाप्रकारे पोलीस दलास मदत करू इच्छिता (मनुष्यबळ /साहित्य/ आर्थिक/ वाहने व इतर ) ही माहिती आपण कृपया कळविण्यास विनंती आहे.

पोलिसांशिवाय समाजातील अनेक घटक असे आहेत की ज्यांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे. ज्यावेळी आम्हास आपली आवश्यकता लागेल तेव्हा आपणास संपर्क साधण्यात येईल आपण तेव्हा आमच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मदत करावी, परंतु तोपर्यंत आपण स्वतः मदतीसाठी बाहेर पडू नये असे आवाहन मी जिल्हा पोलीस दलातर्फे करत आहे असे डॉ. मुंढे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या