
सौदी अरेबियाने मंगळवारी येमेनच्या मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला केला. सौदीने दावा केला की, येथे संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधून फुटीरतावादी गटाला शस्त्रास्त्रांची खेप पाठवण्यात आली होती.
सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, यूएईच्या फुजैरा बंदरातून मुकल्ला येथे आलेल्या दोन जहाजांमधून मोठय़ा प्रमाणात शस्त्र आणि लष्करी वाहने उतरवली जात होती. या जहाजांचे ट्रकिंग सिस्टम बंद होते. सौदी अरेबियाचे म्हणणे आहे की, ही शस्त्रs सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (एसटीसी) नावाच्या फुटीरतावादी गटाला दिली जात होती.
सौदी सैन्याने सांगितले की, ही शस्त्त्र शांतता आणि स्थिरतेसाठी धोकादायक होती. त्यामुळे हवाई दलाने मर्यादित हल्ला करून शस्त्रs आणि लष्करी वाहनांना लक्ष्य केले. हल्ला रात्री करण्यात आला जेणेकरून सामान्य लोकांना नुकसान पोहोचू नये. सौदीने ऑपरेशनचा एक व्हिडीओदेखील जारी केला. याचदरम्यान येमेनच्या प्रेसिडेन्शियल लीडरशिप कौन्सिलने यूएईसोबतचा संरक्षण करार रद्द केला आहे.



























































