पाकिस्तानचे हुक्कापानी बंद! सौदी अरबने ठणकावले, कर्जही देणार नाही,

चीनच्या इशाऱयावरून कश्मीरवर चर्चा करण्याची केलेली मागणी पाकिस्तानला जबरदस्त महाग पडली आहे. सौदी अरबने पाकिस्तानचे हुक्कापानीच बंद केले आहे. पाकिस्तानला यापुढे आमच्याकडुन कोणतेही कर्ज देण्यात येणार नाही तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरवठाही बंद करण्यात येणार असल्याचे सौदी अरबने सांगितले.

हिंदुस्थानने गेल्या वर्षी जम्मू-कश्मिरातून कलम 370 हटकले. तेव्हापासूनच पाकिस्तानचे पित्त खवळले आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान कश्मीरचा राग आळवत आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन या संघटनेने बैठक बोलकून त्यात कश्मीरवर चर्चा करावी असा घोषाच पाकिस्तानने सौदी अरब व संयुक्त अरब अमिरातीकडे लावला होता. सौदी अरब या संघटनेचा अध्यक्ष आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलिकडेच यावरून धमकीवजा इशाराही दिला होता. त्यामुळे सौदी अरब व पाकिस्तानचे संबंधही कमालीचे ताणले गेले.

सौदी अरबच्यावतीने आज पाकिस्तानला यापुढे कोणतेही कर्ज देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पाकिस्तानला होणारा पेट्रोल-डिझेलचा पुरवठाही थांबकण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सौदी अरबने पाकिस्तानला यापूर्वी 5.2 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. हे कर्ज अजून थकित असून पाकिस्तानने चीनकडून 1 अब्ज डॉलर्स हातउसने घेऊन या कर्जाचा पहिला हप्ता फेडला.

आपली प्रतिक्रिया द्या