बोर्डाची डागाळलेली प्रतिमा आधी सावरावी लागेल

244

‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार सौरभ गांगुली बुधवार, 23 ऑक्टोबरला हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सूत्रे हाती घेणार आहे. अध्यक्षपदावर विराजमान होताच ‘बीसीसीआय’ची डागाळलेली प्रतिमा सावरण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे गांगुलीने सांगितले.

गांगुली म्हणाला, दहा महिन्यांच्या कार्यकालात ‘बीसीसीआय’साठी बरेच काही करायचे आहे. जय शाह, अरुण धूमल व जयेश जॉर्ज या पदाधिकाऱयांच्या साधीने पुढील योजना आखल्या जातील. तीन वर्षांत मलिन झालेली ‘बीसीसीआय’ची प्रतिमा सुधारण्याचे पहिले आव्हान असेल. याचबरोबर हिंदुस्थानी क्रिकेटला आणखी उंचीवर नेण्यासाठी काही कल्पना अमलात आणायच्या आहेत. कार्यकाल कमी असला तरी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीन, असेही गांगुलीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या