
कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून यंदाचे गोदावरी गौरव पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेते व निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांना लोकसेवा व अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील यंदाचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. सहा क्षेत्रात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
लोकसेवा – निसर्ग प्रेमी, अभिनेते सयाजी शिंदे, विज्ञान – डॉ. अनिरुद्ध पंडित, चित्र – चंद्रमोहन कुलकर्णी, नाट्य – प्रशांत दामले, संगीत – उस्मान खान, साहस – आशिष माने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह आणि २१ हजार रुपये असे असणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १० मार्च रोजी नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहात होणार असून विजेत्यांना अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

























































