स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने दररोजच्या व्याजातून 457 कोटी रुपये कमावले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाही एप्रिल-जूनचा निकाल जाहीर केला. यात बँकेचे नेट प्रॉफिट 17,035 कोटी रुपये झाले आहे. एक वर्षाआधी सरासरी तिमाहीच्या तुलनेत 0.9 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेचा नफा 16,884.29 कोटी होता.
उत्पन्नात वाढ
या तिमाहीत स्टेट बँकेचे एनपीआय घसरले. गेल्या तिमाहीत पीसीआरसुद्धा 41 बीपीएस कमी होऊन 74.41 टक्के राहिले. एसबीआयची एकूण कमाई वाढली आहे. जून तिमाहीत ही 13.55 टक्के वाढून 1,22,687 कोटींवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत 1,08,038 कोटी रुपये होते. एसबीआयचा मार्केट कॅप 7.56 लाख कोटी रुपये झाला आहे.