एसबीआयचे गृहकर्ज स्वस्त, नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होणार

200

स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व कालावधीच्या कर्जावरील एमसीएलआरअर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट 10 बेसिक अंकांनी कमी केले आहेत. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होणार आहे. नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत, मात्र मुदतठेवींवरील व्याजदरात कपात केली.

दरातील कपातीमुळे वार्षिक एमसीएलआर 8.25 टक्क्यांहून 8.15 टक्क्यांवर आले आहे. एसबीआयने चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. ऑगस्टमध्ये आरबीआयच्या पतधोरण  आढावा बैकठीनंतर बँकेने दुसऱयांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. धोरणात्मक आढाव्यानंतर बँकेने बेसिक पॉइंटची कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर नवे दर 10 ऑगस्टपासून लागू झाले होते.

मुदत ठेवींवर व्याजदरात कपात

एसबीआयने एकीकडे एमसीएलआरमध्ये कपात केली असतानाच मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी केले आहेत. सर्वच कालावधीवरील किरकोळ मुदत ठेवींवर (रिटेल एफडी) 20-25 बेसिक पॉइंटची कपात केली आहे. ठेवीदारांसाठी दरात 10-20 बेसिक पॉइंटची कपात केली आहे. नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील. गेल्या दोन महिन्यांत तिसऱयांदा बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या