उपहार सिनेमा अग्निकांड, सर्वोच्च न्यायालयाचा अन्सल बंधूंना दिलासा

234

उपहार सिनेमा अग्निकांडप्रकरणी रिअल इस्टेट टायकून अन्सल बंधूंना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. याप्रकरणी पीडितांनी दाखल केलेली क्युरेटीव्ह याचिका कोर्टाने फेटाळून लावल्यामुळे त्यांना आता कारागृहात जावे लागणार नाही. कोर्टाने हा आदेश 13 फेब्रुवारीलाच दिला होता, मात्र गुरुवारी तो जाहीर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामना आणि न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने पीडितांची क्युरेटीव्ह याचिका पाहिली. त्यात त्यांनी अन्सल बंधूंना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र याचिकेत काहीच विशेष तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी ती फेटाळून लावली. 13 जून 1997 रोजी उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीमुळे तळमजल्यावर उभ्या असलेल्या मोटारी जळून खाक झाल्या होत्या. या अग्निकांडात 59जणांचा मृत्यू झाला होता, तर 103 जण जखमी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या