गोव्यातील स्कार्लेट खून प्रकरणी आरोपीला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

46

सामना प्रतिनिधी । पणजी

ब्रिटिश युवती स्कार्लेट किलींग हिच्या खूनप्रकरणी  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आरोपी सॅमसन डिसोझाला 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर त्याला 2.60 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला.ब्रिटिश युवतीचे हे प्रकरण देशात आणि विदेशात गाजले होते. आजच्या निवाडयाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.

डिसोझाला न्यायालयाने 17 जुलै रोजी दोषी ठरवून निवाडा राखून ठेवला होता. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. तर या प्रकरणातील दुसरा संशयित प्लासिडो कार्व्हालो याला न्यायालयाने निर्दोष ठरवले होते.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.डी धनुका व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. शिक्षेवर युक्‍तीवाद करताना सीबीआयने आरोपी सॅमसन डिसोझा याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. न्यायालयाने  त्याला कुठलीही दया दाखवू नये. अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांना कठोर संदेश जाणे आवश्यक असल्याची मागणी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या