
सामना प्रतिनिधी । नगर
तंबाखूवर सर्वत्र बंदी असताना सर्रासपणे विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांच्या पथकाने कोठला परिसरामध्ये १० लाखाची सुगंधी तंबाखू जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी समीर बाबुलाल कुरेशी (रा.झेंडीगेट), निराज खान जमीर खान मन्सुर खान (दोघेही राहणार उत्तरप्रदेश, हल्ली कोठला) याच कोठला परिसरातील झोपडपट्टीमध्ये एका रुमवजा रिकाम्या खोल्यांमध्ये सुगंधी तंबाखू व पान मसाला यांचा मोठा साठा असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत या खोल्यांमध्ये ३६ पोते व्हीवर कंपनीची सुगंधी तंबाखू व विमल पान मसाला असा १० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर तंबाखू विक्रीसाठी जवळ बाळगणार्या समीर बाबूलाल कुरेशी व त्यांचे दोन साथीदार यांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना अन्न व भेसळ अधिकार्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुरेश सपकाळे यांच्या पथकातील पोलिस उप निरिक्षक हेड कॉस्टेबल काळे, पो. ना. बाळकृष्ण दौंड, वाघमारे, गायकवाड, पो. कॉ. रोहकेले, कोतकर, याकुब सय्यद यांनी केली आहे.































































