मुलांना शाळेत पाठवणार का? पाहा पालकांनी काय दिलं उत्तर

21 सप्टेंबरपासून अनेक राज्ये शाळा उघडण्याची तयारी करत आहेत. अनलॉक 4.0 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली, पण त्यात पालकांची परवानगी असणे जरूरी असल्याचे म्हटले आहे. जेव्हा पालक लेखी पत्र देतील तेव्हाच मूल शाळेत जाऊ शकते. केंद्र सरकारने शिक्षण संचालनालयाद्वारे एक फॉर्म जारी केला आहे. या फॉर्मद्वारे पालकांचे मत जाणून घेण्याचा सल्ला दिला होता. गुगल फॉर्ममधील बर्‍याच पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे.

पालकांनी दिला स्पष्ट नकार

राजधानी दिल्लीतील द्वारका येथील बाल भारती शाळेमधील 65% पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याच्या विरोधात होते, 15% लोकांना तटस्थ 15% लोकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास सहमती दर्शवली आहे. माउंट अबू पब्लिक स्कूल रोहिणी येथे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या 75% पालकांनी सांगितले की, त्यांना आपल्या मुलांना शाळांमध्ये पाठवायचे नाही. दुसर्‍या एका खासगी शाळेत, 400 विद्यार्थ्यांपैकी केवळ 25 विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पाठविण्यास तयार होते.

यावरून स्पष्ट होत आहे की, पालक मुलांना पाठवण्यास तयार नाहीत. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या