शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करा, पालिका शिक्षणाधिकाऱयांची सूचना

429
फोटो प्रातिनिधीक

शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुंबई महापालिका शिक्षणधिकाऱयांनी शाळांना केली आहे. मुंबई सह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून प्रत्यक्ष शाळा सुरू करायची की नाही याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

शाळा बंद असल्याने आजवर शाळा व्यवस्थापन समितीची बैठकही पार पडली नव्हती पण आता महापालिका शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळांना आता व्यवस्थापन समितीची बैठक घ्यावी लागणार आहे. या बैठकीत शाळा सुरू करायची की नाही याची शिफारस शिक्षणाधिकाऱयांकडे करावी लागणार आहे.

शिक्षण विभाग तयारीला लागले
केंद्र सरकार शाळा सुरू करण्याविषयी पालकांची मते जाणून घेणार आहे. त्यानुसार सर्व राज्यातील शिक्षण सचिव पालकांची मते जाणून घेणार आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर शिक्षण विभाग प्रत्यक्ष शाळा करण्यासाठी तयारीला लागले आहे.

त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांकडून माहिती मागविली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत होणारा निर्णय शिक्षणाधिकाऱयांना कळवावा लागणार आहे.

अद्याप बैठका नाहीत
शाळा व्यवस्थापन समितीमधील काही पालक गावी गेले आहेत. त्यामुळे काही शाळांच्या आतापर्यन्त बैठकांचा झालेल्या नाहीत. या बैठकीत पालक प्रातिनिधी उपस्थिती राहू न शकल्यास शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय उपस्थिताना घ्यावा लागणार असल्याचे, एका मुख्याध्यापकाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या