हिंदुस्थान बंदच्या पार्श्वभूमीवर काही शाळा बंद

सामना ऑनलाईन । ठाणे

पेट्रोल डिझेलवच्या भाव वाढीविरोधात आक्रमक होऊन विरोधकांनी सोमवारी हिंदुस्थान बंदची हाक दिली आहे. खबरदारी म्हणून डोंबिवलीच्या ओमकार ग्रुप शाळा व्यवस्थापनाने सुटी जाहीर केली आहे. तसे संदेशच पालकांना देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी असूनही तेलाचे भाव का वाढतात असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी सोमवारी काँग्रेसने हिंदुस्थान बंद पुकारला आहे. त्यासाठी इतर विरोधकांनीही पाठिंबा दर्शवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डोंबिवलीतल्या ओमकार ग्रुप शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याच निर्णय घेतला आहे.