शिवसेना शाखा क्रमांक 208 आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, भायखळा विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्ण मित्र परिवार तथा सहयोगी संस्था यांच्या सहकार्याने आशा प्रबोधिनी संस्था, नारळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी व्हीलचेअरचे वाटप आणि 11 वी ते 15 वीच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. नारळवाडी, गणेश मंदिराजवळ, माझगाव येथे हा कार्यक्रम पार पडला.
शिवसेना उपनेते नगरसेवक मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेवक, रमाकांत रहाटे यांच्या हस्ते वितरण झाले. यावेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे देविदास माडये, बबन सकपाळ, भायखळा विधानसभा संघटक मंगेश बनसोड, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, सहसंघटिका शिल्पा जाधव, रमेश रावल, अंजना औटी, चेतन थोरात, शिल्पा म्हात्रे, एम. डी. कांबळे, रमेश माडये, नितीन गंधाले, विजय नाईक आदी उपस्थित होते.