
देशभरात अनलॉक-5.0 सुरु असून 15 ऑक्टोबरपासून शाळा उघडणार आहेत. याबाबत पेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मात्र शाळा उघडण्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकार आणि पेंद्र शासित प्रदेश यांना असणार आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग संपलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळा आणि राज्य सरकारांची असणार आहे. याबाबतची मानक कार्यप्रणाली (एसओपी) राज्यांनी ठरवायची आहे.
काय आहेत गाईडलाईन्स
शाळा टप्या-टप्याने सुरु कराव्यात. सुरुवातीला नववी ते बारावीचे वर्ग होतील.
पालकांची लेखी परवानगी असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात.
रोज शाळेत हजर राहण्याची विद्यार्थ्यांना सक्ती नाही. ऑनलाईन शिक्षणावर भर.
विद्यार्थामध्ये सहा फुटाचे अंतर हवे. मास्कची सक्ती. शाळेत सँनिटायझर आवश्यक.
दोन-तीन आठवडे विद्यार्थाना गृहपाठ देऊ नये.

























































