बाप्पाच्या विसर्जनात खवळलेल्या समुद्राचे ‘विघ्न’

गणरायाच्या आगमनाबरोबरच मुंबईसह कोकण परिसरात वरूणराजानेही जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. ढगाळ वातावरण आणि संततधार पावसात आज दीड दिवसाच्या गणपतीचे विर्सजन होणार आहे. मात्र समुद्र खवळलेला असल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनात विघ्न आली आहेत. समुद्राच्या लाटा किनारपट्टीवर आदळत असल्याने विर्सजनाप्रसंगी खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे.

सोमवारी वाजत-गाजत गणपतीबाप्पांचे आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार घरगुती आणि 111 सार्वजनिक गणपती विराजमान झाले. मंगळवारी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येणार असून संध्याकाळी तीन वाजल्यानंतर दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन सुरु होईल. रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या 10 हजार गणपतींचे आज विसर्जन होणार आहे. बहुतांश गणेशमूर्तींचे विर्सजन समुद्रकिनारी होते. समुद्र खवळलेला असल्याने विसर्जनाच्यावेळी खरबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे. समुद्राच्या लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनात खवळलेल्या समुद्राचे विघ्न आहे.

आपली प्रतिक्रिया द्या