राज्याच्या सीमा बंद करा, मजुरांचे पलायन रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

1166

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीतून मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे दिल्ली सीमेवर मोठ्या प्रमाणात मजुरांची गर्दी झाली आहे. या दरम्यान केंद्र सरकारने राज्याच्या  आणि जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारी अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार देशातील काही भागात मजूर आपल्या गावी निघाले आहेत. त्यांचे पलायन रोखण्यासाठी राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच शहरातील कुठल्याही महामार्गावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असता कामा नये असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

जिल्ह्याच्या सीमेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांवर देण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान गरीब, गरजू आणि मजुरांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या मार्गावर कुठलीच वर्दळ दिसत कामा नये याची जबाबदारी DM आणि SP यांच्याकडे देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या