
‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात दुसरा जनता दरबार दिन पार पडला.
दुसऱ्या जनता दरबार दिनात दोन तक्रार अर्जांवर सुनावणी घेऊन दोन्ही तक्रारींचे निवारण करण्यात आले. गोठेघर येथील गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याबाबत अर्ज जनता दरबार दिनात आला. या अर्जावर सुनावणी करताना गायकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना यापूर्वी दिलेल्या पत्राबाबत स्मरण पत्र देऊन त्यात मागणी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.