परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, गृहमंत्रालयाने दिली बुलेटप्रूफ कार

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना बुलेटप्रूफ कार दिली आहे. तसेच त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्यांना याआधी सीआरपीएफ कमांडोंची झेड श्रेणीची सुरक्षा आहे.