मुंबईत कडेकोट बंदोबस्त, 40 हजार 400 सुरक्षा रक्षक तैनात

शहरात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहरात जवळपास 40 हजार 400 सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार असून त्यात सीपीएमएफच्या 22 कंपन्या, एसआरपीएफच्या 12 कंपन्या आणि 2700 होमगार्डस्चा समावेश आहे.

  • मुंबईत कोणतेही असुरक्षित बूथ नाहीत.
  • एकूण 269 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली.
  • मुंबई शहरात 522 स्थानांवर 2594 बूथ.
  • मुंबई उपनगरात 1046 स्थानांवर 7397 बूथ.
  • निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या आतापर्यंत 34 प्रकरणांची नोंद.
  • फोर्स वन, क्यूआरटी, असॉल्ट टीम, दहशतवादविरोधी पथक या सुरक्षा यंत्रणांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या असून इंटेलिजन्स टीमदेखील तैनात राहणार.
  • वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी शहरातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्र परिसरात नो पार्किंग लागू केली आहे.

पोस्टल बॅलेटद्वारे पोलिसांचे मतदान

मुंबई पोलीस दलातील 10 हजारांपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱयांनी पोस्टल मत पत्रिकेद्वारे मतदानासाठी स्वतःची नोंदणी केली आहे.

कोटय़वधीची रोकड, दारू, शस्त्र जप्त

आचारसंहिता कालावधीत शहरामध्ये 42 प्रकरणांची नोंद करून तब्बल आठ कोटी 14 लाख 20 हजार 403 रुपयांची रोकड पकडण्यात आली. शिवाय 10 लाख 80 हजार 264 रुपयांची दारू, 16 लाख 34 हजार 644 रुपयांचे अमली पदार्थ आणि 511 बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आली.

अफवांवर विश्वास ठेवू नका

मतदानादिवशी कोणत्याही अफवा पसरवू नयेत. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही संशयास्पद दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्प साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या